गावाविषयी माहिती
रानवड हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. रानवड गावात सोमेश्वर महादेव मंदिर, मारुती मंदिरामध्ये श्री राम, सीता, लक्ष्मण व विठ्ठल रुक्मानी यांचे मंदिरे आहे शनीमंदिर असून हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३६८५ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ , अंगणवाडी केंद्रे ४ व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सन २०१८ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत रानवड ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असून गावातील १००% कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात
रानवड ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रानवड गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ११ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
रानवड येथे कर्मावरी काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान आहे. कारखान्यामुळे रानवड मधील व इतर गावांमधील ऊस उत्पादक यांना उत्पन्न मिळते तसेच अनेक बेरोजगारांना रोजगार मिळतो तसेच परिसरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच रासाका परिसरातील गावांच्या विकासालादेखील हातभार लागणार आहे. तसेच अनेक तरुण या परिसरात छोटे-मोठे व्यवसायदेखील करणार असल्याने रानवड गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.